July 23, 2009

"झपूर्झा", केशवसूतांची कविता शंभर वर्षांनंतर

"झपूर्झा", केशवसूतांची कविता शंभर वर्षांनंतर


(लेखन: मुंबई, २ जुलै १८९३; प्रसिध्दी: करमणूक, १२ जुलै १८९३, पृष्ट ९८; लेखक "केशवसूत" कृष्णाजी केशव दामले: जन्म ७ आक्टोबर १८६६, रत्नागिरी, मालगुंड; मृत्यू ७ नोवेंबर १९०५)


केशवसूत सुरवातीला पुढील टीप लिहितात:
"आपल्यास जें कांहीं नाहीं असें वाटतें, त्यातूनच महात्मे जगाच्या कल्यानाच्या चिजा बाहेर काढितात. त्या महात्म्यांची स्थिति लक्ष्यांत वागवून पुढील गाणे वाचल्यास ते दुर्बोध होऊं नये, असें वाटतें."

झपूर्झा


हर्षखेद ते मावळले,
हास्य निवालें,
अश्रू पळाले,
कण्टकशल्यें बोंथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांहीं दिसे दृष्टीला,
... प्रकाश गेला,
... तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितीला?
... झपूर्झा गडे झपूर्झा!


हर्षशोक हे ज्यां सगळें
... त्यां काय कळे?
... त्यां काय वळे?
हंसतील जरी ते आम्हाला,
भय धरूं हे वदण्याला:-
व्यर्थीँ
* * *

"झपूर्झा" आम्हाला शाळेच्या पाठ्यपुस्तकात होती. त्यावेली आचार्य अत्र्यांची "नवयुग वाचनमाला" अभ्यासाला होती. झपूर्झा समाविष्ट करायला अत्र्यांसारखाच प्रचंड, अष्टपैलू व्यक्तित्वाचा संपादक हवा. नवयुग वाचनमालेच्या रुपाने त्यांच्या अप्रत्यक्ष उपस्थितीत आम्ही मराठी वाचायला-लिहायला शिकलो हे आमचे सौभाग्य.

झपूर्झा ऐकली - पाहिली की "झिम पोरी झिम" मला हमखास आठवते. एक आठवली की दुसरी आठवणारच. आता गणपती आले तरी या महानगरात "झिम्मा" कानावर पडत नाही. त्याच्या अनुपस्थितीमुळेच बहुधा "झिम पोरी झिम" मला या उत्सवात सतत आठवते; बरोबरच "झपूर्झा".

झपूर्झाची जीवन-प्रवृत्ति आणि झिम्माची जीवनासक्ति या दोनींचे "साधन आणि साध्य" (means and goal) एकच आहेत: ते म्हणजे "आनंद" (Joy)! हा कलेचा मूलभूत पाया आहे असे मला वाटते. असे जर विद्येच्या सर्व शाखांतून आणि राजकारण, धर्मकारण, समाजकारण, उदिम-व्यापार-शिक्षण क्षेत्रांत झाले तर आजची अनागोंदी, अव्यवस्था, अराजकता आणि हिंसाचार राहील का?

महाराष्ट्र भाषासंचनालय या सरकारच्या खात्याने केशवसूतांच्या हस्तालिखितांचा संग्रह प्रसिध्द केलाय. मूळ हस्तालिखितांचे फोटो, संशोधित व विस्तृत संदर्भ आणि टीपा, आर्ट पेपरवर सुबक छपाई व पुठ्ठ्याची बांधणी यानी नटलेले हे पुस्तक केशवसूताना यथोचित श्रध्दांजली आहे.

महाराष्ट्र राज्यसराकाराचे "महाराष्ट्र भाषासंचनालय" हे एक तरी खाते काही गाजावाजा न करता स्थिरपणे व धीराने प्रसंशनीय काम करतेय हे खरोखरच कौतुकास्पद आहे. मराठी भाषिकाना व भाषाप्रेमीना याचे समाधान पण वाटावे.

- रेमीजीयस डिसोजा
स्थळ: मुंबई


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

3 comments:

  1. उस डोंगा परी रस नाही डोंगा
    काय भुललासी वरलीया रंगा
    -- संत तुकाराम

    I don' think these are Tukaram's lines. Probably Chokhamela.


    पर्यावरणाची वैश्विक व्याख्या
    ॥ वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी॥
    -- श्री ज्ञानेश्वर

    This is Tukaram, not Jnaneshwar.


    You say Keshavasuta was born on 7-Oct, some sources say the date was 15-March.

    ReplyDelete
  2. Thanks for your observations.
    I would however wish to know now for sure, about your first two points.

    I had changed the reference of the second from Tukaran to Jnaneshwar after publishing it.

    I have known these two stanzas from childhood that they are quoted from Tukaram.

    Birth date of Keshavasuta is mentioned in the book published by Govt. of Maharashtra, which is mentioned in the post.

    Thanks again.

    Remi

    ReplyDelete
  3. I don't think Tukaram, Jnaneshwar, Chokhamela are concerned about "Copyright"!

    ReplyDelete